देव देश व धर्मासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्य – प.पू. मोहनबुवा रामदासी

नरेंद्रजी फिरोदिया,मोहनबुवा रामदासी,दादा वेदक,गोविंदराव शेंडे और शंकरजी गायकर उद्घाटन करते हुये

विश्व हिंदू परिषद , बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देव देश व धर्मासाठी कार्य करणाऱ्या प्रमुख संघटना आहेत सर्व संतांनी आपापल्या परीने ही धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेतली. प्रभूरामचंद्रांसारखेआदर्श दैवत हिंदू समाजासमोर असावे म्हणून समर्थांनी राम दैवत म्हणून निवडले. व जय जय रघुवीर समर्थ असा मंत्र दिला. दास हा मारुती सारखा असावा. समर्थ रामदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्र उभे केले. असे प्रतिपादन जेष्ठ संत प.पू मोहनबुवा रामदासी यांनी मुंबई क्षेत्र परिषद शिक्षा वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी केले.या वर्गात विदर्भ ,देवगिरी,कोंकण,पश्चिम महराष्ट्र प्रांतातून ८८ शिक्षार्थी उपस्थित आहेत .
विश्व हिंदू परिषदेच्या मुंबई क्षेत्राच्या परिषद शिक्षा वर्गाचे उद्घाटन जेष्ठ संत प.पू मोहनबुवा रामदासी, युवा उद्योजक मा. श्री नरेंद्रजी फिरोदिया , केंद्रीय सहमंत्री व सत्संगप्रमुख श्री दादा वेदक, वर्गप्रमुख श्री गोविंदराव शेंडे व मुंबई क्षेत्र मंत्री श्री शंकरजी गायकर यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी युवा उद्योजक श्री नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले देशाची व समाजाची दशा आणि दिशा बदलावयाची असेल तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची व अश्या प्रशिक्षण वर्गांची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृती जपली पाहिजे. अश्या शिबिरातून संस्कारित व देव देश आणि धर्मासाठी कार्य करणारी पिढी तयार होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करतांना मा. श्री दादा वेदक म्हणाले आपण आपण भाग्यवान आहोत आपला जन्म भारत वर्षाची पुण्यभूमीत झाला. तुम्ही या वर्गात प्रशिक्षित कार्यकर्ता होण्याकरिता दहा दिवस आला आहात. आपल्या रचनेत कार्यकर्ता हा मुख्य बिंदू आहे. तो आदर्श कार्यकर्ता होण्याकरिता या परिषद शिक्षा वर्गाची योजना व आवश्यकता आहे.जागरण, अभियान, सेवा, सुरक्षा व संघटन या बिंदूंवर गेली ५४ वर्षे विश्व हिंदू परिषदेची दैदिप्यमान वाटचाल सुरु आहे असेही वेदक म्हणाले. प्रास्ताविक श्री शंकरजी गायकर यांनी केले.ते म्हणाले समाजात कार्य करत असतांनाकार्यकर्त्यांना चांगली दिशा मिळावी. यासाठी परिषद शिक्षा वर्गाचे आयोजन केले जाते. या शिबिरातून शिक्षा घेऊन शिक्षर्थ्यांनी उंच झेप घेऊन प्रांतातील आपल्या कार्यक्षेत्रात जावे व विश्व हिंदू परिषदेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे. वर्गाचे मुख्याशिक्षक म्हणून श्री मंगलप्रसादघुगे काम पाहणार आहेत. सूत्र संचालन वर्गाचे बौद्धिक प्रमुख श्री संतोष कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन नगर जिल्हा बजरंगदल संयोजक श्री गौतम कराळे यांनी केले.
यावेळी श्री भाऊराव कुदळे, श्री अरुण नेटके , श्री विवेक कुलकर्णी, संघाचेशहरसहसंघचालक मा.श्री वाल्मिक्जी कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह श्री श्रीकांतजी जोशी, अँड अभय आगरकर, विहिंप चे विवेक सोनक, गजेंद्र सोनवणे, डॉ प्रदीप उगले, अनिल देवराव, धनाजीराव शिंदे, भास्करराव गोडबोले व नगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा वशहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रजागरणातसंतांचे योगदान अतुलनीय – श्री विनायकराव देशपांडे

मा. विनायकरावजी देशपांडे मार्गदर्शन करते हुये

विश्व हिंदू परिषद धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आधारावर हिंदू समाजाचे जागरण करते. देशभरातील पूजनीय संतांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात आपले कार्य चालते. श्रद्धा असेल तिथेच विश्वास बसतो. आपलीआपल्या संस्कृतीवर,देवतांवर, धर्मावरनितांत श्रद्धा आहे. ग्रीक, रोमन, सैबेरीअन सारख्या अतिविशाल संस्कृती नष्ट झाल्यात. परंतु आपली संस्कृती टिकली व ती चिरकाल राहणार आहे. जगाच्या इतिहासात राजसत्तेवर आधारित संस्कृती साता गेली की नष्ट होतात. आपल्या संस्कृतीचा आधार धर्म आहे त्यामुळे आपली संस्कृती अनादीआहे अनंत आहे चिरकाल टिकणारी आहे. रणांगणात जरी हिंदू हरले तरीही संस्कृती व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भारत कायम पहिल्या नंबरवर राहिला आहे. जगद्गुरू राहिला आहे. हजारो ऋषीमुनींनी संशोधन करून विकसित केलेले शास्त्र, नीतीयामुळे जगाला मार्गदर्शन लाभले व सभ्यता प्रस्थापित करण्यात यश मिळाले.
राष्ट्रजागरणात योगदान देणाऱ्या हजारो ऋषीमुनीसोबतनजीकच्या काळातील नाव घ्यायचे असेल तर पहिले नाव प.पू आद्यशंकराचार्याचे घ्यावे लागेल. सुमारे २५०० वर्षांपूर्वी शंकराचार्यांचा कालखंड होता. वेदवउपनिषदयावर त्यांनी भाष्य करून त्याचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी अद्वैत तत्वज्ञान मांडले. शैव,वैष्णव,गाणपत्य,शाक्त यासारख्या विविध संप्रदायामध्ये एकता निर्माण होण्यासाठी पंचायतन पूजा सुरु केली. देशाच्या सांस्कृतिक व भौगोलिक एकात्मतेसाठी चार पिठाची स्थापना केली . चार धाम यात्रा सुरु केली यामुळे देशात एकात्मतेचा भाव निर्माण झाला. सन्यास व्यवस्थेला स्वस्वरूप व सुस्वरूप देण्याचे कार्य केले. सागर, तीर्थ, वीर्य,पुरी,अश्या दहा श्रेणी निर्माण केल्यात. शुद्र असो वा महिला सर्वांना वेदपठणाचा अधिकार आहे हे ठणकावून सांगितले. भगवान गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार घोषित केले.
तलावारीच्या बळावर मुसलमानांनी मंदिरे फोडली, हिंदूंचे धर्मांतरण केले. यावर उपाय म्हणून तत्कालीन संत समुदायाने पुढाकार घेतला व जागरण, प्रबोधन करीत हिंदू समाजाला शक्ती आणि भक्तीची कास धरण्यास उद्युक्त केले.
नाथ परंपरा – गुरु गोरक्षनाथांनी सुरवात केली . समरसतेसाठी अस्पृश्यतेचा धिक्कार केले. धर्मांतरण सुफी समाजाने सर्वात जास्त केले त्याला उत्तर देण्यासाठी अल्लख निरंजनचा नारा देत नाथ संप्रदायी गावोगाव फिरून समाजाचे प्रबोधन करीत धर्मरक्षणाचे कार्य केले.
संन्यासी व बैरागी परंपरा – देव देश व धर्मासाठीशास्त्रा बरोबर शस्त्राचेहीप्रशिक्षण दिले. शैव संप्रदायात सन्यासी व वैष्णव संप्रदायात बैरागी हे देशाच्या व धर्माच्या संरक्षणात अग्रणी होते.
भक्ती परंपरा – १) सर्व जाती संप्रदायातून संत झालेत २) महिलाही संत झाल्यात.
३) प्रादेशिकभाषेत प्रचार व प्रसार करण्यात येतो. ४) सर्वकर्मकांड व भेदांचा निषेध केला
केवळ नामस्मरण सत्संग करावा याचा पुरस्कार केला. ५)स्पृश्य अस्पुश्याता यांचा धिक्कार केला ६) देशाच्या सर्व भागात संत झालेत . ७) धर्मांतरणाचा धिक्कार केला.संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत एकनाथ , संत रामदास, संत चोखामेळा,संत नामदेव असे अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेलेत
रामानुज संप्रदाय –प्रवर्तकसंतरामानंदचार्य ३४००० क्षत्रियांची घरवापसी केली. संत कबीर, संत रविदास, संत गोस्वामी, संत तुलसीदास यासारखे संत रामानुज संप्रदायात होऊन गेलेत. हनुमान मंदिराजवळ आखाडा व रामलीला सुरु केल्यात.
राजस्थानात१५ व्या शतकात बाबा रामदेवजींनी धर्मांतरण रोखण्याचे कार्य केले. गुजराथ मध्ये स्वामीनारायण संप्रदायाने भ्रूणहत्या बंद केली. सत्संगातून समरसता आणली. प्रणाली संप्रदाय बंगालमध्येसंतचैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय तर आसाममध्ये संत शंकरदेवांचासंप्रदाय यासारखे अनेक संप्रदाय व साधुसंतांनी राष्ट्रजागरणात अतुलनीय व अमुल्य योगदान दिले आहे.असे प्रतिपादन मुंबई क्षेत्राच्या परिषद शिक्षा वर्गातद्वितीय बौद्धिक सत्रात केंद्रीय संघटन महामंत्रीमा. विनायकराव देशपांडे यांनी केले.
मानसिक परिवर्तनाने देशात समरसता येईल –मा. श्री विनायकराव देशपांडे
देशालास्वातंत्र मिळून ७० वर्षेहोऊनहीआजही आपल्या देशात उच्चवर्णीयांमध्ये अनुसूचित जाती जनजातीबद्दलअनास्था व तिरस्कार आहे.कायदे करून आठवा भय दाखवून समस्या सुटत नाहीत त्यासाठी मानसिक परिवर्तन आवश्यक आहे. अस्पृश्यता भेदाभेद आपल्यातील सर्वात मोठा दोष आहे. आपल्या तत्वज्ञानात आणि आचरणात फरक आहे. त्यामध्ये बदल झाला पाहिजे माणसासोबत माणसासारखा जो व्यवहार करीत नाही तो राक्षस होय असे संत सांगतात अस्पृश्यतेची व्याख्या करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी म्हणले सवर्ण हिंदूंच्या मनामध्ये काही जातींच्या हिंदूंबद्दल जो हीन भाव आहे ते म्हणजे अस्पृश्यता
आपल्या तत्वज्ञानानुसार जो शिकतो व विनामोबदला शिकवतो तो ब्राह्मण होय. जो देव देश धर्माच्या रक्षणाकरिता शस्त्र उचलतो तो क्षत्रीय होय .जो व्यापार करतो , शेती करतो,व जो पशुपालन करतो तो वैश्य होय . तर वरील तिघांची सेवा करतो तो शुद्र होय. वेदकाळात अस्पृश्यता नव्हती. हा भेद नंतर आला. वेद्कालातील असंख्य दाखले देत हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. भारतामध्ये ४ थ्या शतकापर्यंत व काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सहाव्या शतकापर्यंत अस्पृश्यता नव्हती. केंद्र सरकारच्या इंडेक्सनुसार ४२९ जाती अस्पृश्य आहेत. परंतु त्यातील ४२७ जातींचा १२ व्या शतकापर्यंत कुठेही उल्लेख नाही.भारतात इस्लामच्या आक्रमणानंतर अस्पृश्यतेचे संकट ओढवले. जे परभूत झालेत त्यांना हलक्या प्रतीचे काम दिल्या गेले व त्यांना गावाच्या शेवटच्या टोकाला राहावयास सांगितले. गावाच्या अंत्यला राहणारेम्हणून आपण त्यांना अंत्यज म्हणतो .वाल्मिकी समाज चर्मकार समाज १०० वर्षांपूर्वी सवर्ण होते.१६ व्या शतकापूर्वी गोंड हे क्षत्रिय होते. अनुसूचित जाती जनजातीचे बांधव व वनवासी बांधव हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी व धर्माच्या रक्षणासाठी लढणारे योद्धे आहेत.आज आपण हिंदू आहोत हे त्यांनी केलेला संघर्ष, त्याग व भोगलेल्या अतोनात हाल अपेष्टांचे फलित आहे त्यांचे हे उपकार आपण कधीही विसरू नये.१४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत जातींची संख्या ५ पटीने वाढली. अनुसूचितजाती जनजातीच्या व वनवासी बांधवांना सहानुभूती नको आहे. सन्मान व संवेदनशीलता हवी आहे. असे प्रतिपादन मुंबई क्षेत्राच्या परिषद शिक्षा वर्गात तृतीय बौद्धिक सत्रात केंद्रीय संघटन महामंत्री श्री विनायकराव देशपांडे यांनी केले.
धेय्याकरीता कसे जगावे हे आपल्या पूर्वजांनी दाखवून दिले.-मा. श्रीमिलिंदजी परांडे

मा. मिलिंदजीपरांडे मार्गदर्शन करते हुये

आपल्या देशात वर्तमान परिस्थितीमध्ये प्रामुख्याने इसाई, इस्लाम, कम्युनिस्ट व उपभोक्तावाद ही आक्रमणे आहे.यापासून देव देश व धर्माचे रक्षण करावयाचे कार्य करतांना प्रशिक्षित कार्यकर्ता असणे आवश्यक आहे. याकरिता आपण प्रशिक्षण वर्गाची रचना करतो. आदर्श कार्यकर्ता बनण्याचे आवश्यक गुण आपल्या मध्ये येणे आवश्यक आहे. यामध्ये आपण जे कार्य करतो त्याची माहिती आपल्याला असावी म्हणजे आपण समजून उमजून कार्य करावे.स्वाध्याय करावा. कार्यासाठी योग्य बनावे सतत कार्यकर्ता म्हणून स्वतःचा विकास करावा. विकास थांबला की कार्यकर्ता संपतो.त्याचे चारित्र्य चांगले असावे सत्यानिष्ठ असावा. आर्थिक व्यवहार शुद्ध असावे, जबाबदारीचे भान असावे.आपण केवळ कार्य करणारे नाही तर करवणारे सुद्धा आहोत. मान पचवता आला पाहिजे, संघटनशरण असावे. अनुशासन आवश्यक आहे. सर्वात श्रेष्ठ दान साम्याचे आहे. आपले कुटुंब , आपली नोकरी अथवा व्यवसाय व संघटनेचे कार्य यांना द्यावयाच्या वेळेचे नियोजन करता आले पाहिजे.
ध्येय्याकारीता कसे जगावे हे आपल्या पूर्वजांनी आपल्या आचरणातून व संघर्ष करून दाखवून दिले. त्यांनी आचरण व संघर्ष करून आपला देव देश व धर्माचे रक्षण केले म्हणून आपण आज हिंदू आहोत. कार्यकर्त्याचीनिष्ठा, चारित्र्य व सक्रियता उत्तम असेल तर कार्य योग्यरीतीने पुढे जाते असे प्रतिपादन मुंबई क्षेत्राच्या परिषद शिक्षा वर्गात चतुर्थ बौद्धिक सत्रात केंद्रीय महामंत्री श्री मिलीन्दाजी परांडे यांनी केले.
संकलन –
विवेक सोनक , पश्चिम महाराष्ट्र प्रांत , प्रचार सहप्रमुख

 

 

 

 

Back To Top