सेवाकुंभ प.महाराष्ट्र प्रांत – मुंबई क्षेत्र

राष्ट्र निर्माण व सेवा प्रकल्पांचे दर्शन घडविणारा सेवा कुंभ-माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे 
विश्व हिंदू परिषदेच्या सेवा कुंभात विविध सामाजिक सेवाभावी संथांचा मेळावा
नगर 09/02/2020 -सेवा परमोधर्म आहे.विश्व हिंदू परिषदे तर्फे देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य सुरु आहे.दर ५ वर्षांनी प्रांतात सेवा कुंभ घेतला जातो.वसतिगृहातून सुसंस्कारित नागरिक घडविण्याचे महत्तम कार्य अनेक वर्षांपासून होत आहे.वसतिगृहांना २५ वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने सेवा कार्याची प्रगती झाली आहे.या सेवाकुंभामुळे विश्वहिंदू परिषदेची सेवाभावी संस्था म्हणून ओळख झाली आहे.परंतु हि सेवा कार्य प्रसिद्धीपासून परामुख आहेत.सेवा कुंभातून सेवा कार्याचा प्रसार व एकत्रीकरण व्हावे.सेवा कार्य करणारे कार्यकर्ते जोडले जावेत.तसेच सेवाभावी संस्थांना योग्य मार्गदर्शन मिळावे.हा हेतू सेवा कुंभातून साध्य होतआहे.विहिप द्वारे वाडी वस्तीवर राहणारे आदिवासी अभावग्रस्त बांधवांसाठी एकल विद्यालये.रुग्ण सेवा,आरोग्य केंद्र,बालवाडी,वसतिगृहे,शाळाआदी सुविधा विश्व हिंदुपरिषदे तर्फे देण्यात येत आहे.लाखो वंचीत बांधवांच्या जीवनात आशेचा किरण प्रजवलित करून स्वाभिमानी समाज निर्माणाचे कार्य विहिप करत आहे.विद्यार्थी शिक्षन व संस्काराचे धडे घेत आहेत.हेच विद्यार्थी देशाचे आदर्श नागरिक व व्यक्ती निर्माणाचे कार्य होत आहे.पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील नगर येथील सेवा कुंभ राष्ट्र निर्माण व सेवा प्रकल्पांचे दर्शन घडविणारा आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे यांनी केले आहे.

केडगाव येथील डॉ.हेडगेवार संकुलात विश्व हिंदु परिषदेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रांत सेवा कुंभ उत्साहात पार पडला.समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतर राष्ट्रीय अध्यक्ष माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे बोलत होते.या प्रसंगी विश्व हिंदुपरिषदेचे केंद्रीय मंत्री सह सेवा प्रमुख प्रा.मधुकरजी दीक्षित,जैन मुनी पदम ऋषीजी म.सा.अलोक ऋषीजी म.सा.प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,ह भ प अर्जुन महाराज जाधव,प्रांत संघचालक नानासाहेब जाधव,गिरीवरधारी प्रभू (इस्कॉन मंदिर),प्रांत मंत्री विजय देशपांडे,आंतरराष्ट्रीय खेळाडू सौ.अंजलीताई वल्लाकट्टी ,सिने कलावन्त सौ.अनुजा कांबळे,प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर,क्षेत्र गोरक्षण प्रमुख भाऊराव कुदळे,प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण,प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,संजय मुरदाळॆ,कोषाध्यक्ष महेंद्र देवी,माजी खासदार दिलीप गांधी महापौर बाबासाहेब वाकळॆ,कमलेशजी पांचाळ,जिल्हा संघचालक डॉ रवींद्र साताळकर,डॉ दिलीप धनेश्वर,शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,वाल्मिक कुलकर्णी,नाना गोविलकर,संजय कुलकर्णी,नाशिक सेवा विभागाचे प्रमुख महादेव सोनवणे,प्रांत सेवा सहप्रमुख डॉ.प्रदीप उगले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री सह सेवा प्रमुख प्रा.मधुकरजी दीक्षित म्हणाले कि,देशभरात विहिप द्वारे १,८६,००० सेवा कार्य सुरु आहेत.स्वामी विवेकानंद यांनी धर्म परिषदेत माता आणि भगिनी असा उल्लेख केला आहे.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज याना सर्व माउली म्हणून संबोधतात.हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी मातृत्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.सेवा सुरक्षा व संस्कार या त्रीसुत्रीप्रमाणे विहीप चे कार्य होत आहे.भारत जगद्गुरू होण्यासाठी सेवा करायची वाढ होणे आवश्यक आहे.  हभप अर्जुन जाधव महाराज म्हणाले कि,सेवा कार्य हे ईश्वरी कार्य असल्याने विश्व हिंदुपरिषदेचे कार्याची महती सर्वत्र समाजात पोहोचली आहे.सेवा कार्यात विश्व हिंदुपरिषेदेचे योगदान अभूतपूर्व आहे.दीर्घकाळ सेवा कार्य करणारी हि जगातील एकमेव संघटना आहे.                                                         अंजली वल्लाकट्टी म्हणाल्या कि,महिलांना ५० टक्के आरक्षण नवे  तर १०० टक्के संरक्षणाची गरज आहे वसतिगृहातील बालकानी कोणतीही सुविधा नसताना सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आहे .मुलींनी समाजात वावरताना संस्कार विसरू नका.परंतु एखाद्याने  वाकडी नजर करून बघितले तर त्याचे डोळे काढण्याची ताकद मनगटात ठेवा.अनुजा कांबळे म्हणाल्या कि,विश्व हिंदुपरिषदेचे कार्य भारावून टाकणारे आहे.हिंदुत्वाचे जागरण करण्याची गरज आहे.ज्या शाळेत हिंदू संस्कृती शिकवली जाते त्या शाळेतच आपली मुले शिकवा. गिरीवरधारी प्रभू म्हणाले कि,जे धर्म पालन करत नाहीत,धन व विद्यादान,सेवा कार्य करत नाहीत असे लोक पृथ्वीला भार झाले आहेत.ते मनुष्य रूपात असूनही पशूंप्रमाणे आहेत.सागर व पर्वताचा भार पृथ्वीला होत नाही.याच तत्त्वज्ञानाच्या आधारे वि हि प समाजात मनुष्य निर्मितीचे कार्य करीत आहे.हे कार्य जगभर पसरले आहे.जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचे रक्षण करतो .                                                                                                     या सेवाकुंभात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी ताडपी नृत्य,देशभक्तीपर गीत, महाराष्ट्राची लोकधारा,तांडव नृत्य,दशावतार,मोबाईलचा दुष्परिणाम मूकाभिनयाद्वारे सांगितला विविध गुण दर्शनातून सादर केले . कार्यक्रमात जनकल्याण समिती,स्नेहालय,धुंड महाराज आश्रम शेवगाव,भारतीय विचार धारा पुस्तक विक्री प्रदर्शन,संजीवनी मुलींचे वसतिगृह (तळेगाव दाभाडे)आदी सेवाभावी संस्थांनी सहभाग घेऊन सेवा कार्याची माहिती प्रदर्शनात दिली.या प्रदर्शनीचे उदघाटन प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले.याप्रसंगी ४० वर्ष दिंडीच्या सेवेसाठी भास्कर गोडबोले,यशवंत देशपांडे तसेच डॉ मनोहर देशपांडे(तलासरी वसतिगृह),दिनेश शहा(रक्तदान),युवराज गुंड (उत्कर्ष बालघर),रवींद्र सिद्धेश्वर,अशोक चोरमले आदींचा सेवा कर्याबद्दल गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता व श्रीरामाचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदु परिषदेचे सर्व पदाधिकारी,विद्यार्थी,स्वयंसेवक,नागरिक ,विवि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण यांनी प्रास्तविक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजरंगदलप्रमुख गौतम कराळे,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,शहरमंत्री अनिल देवराव,शहर सहमंत्री राजेंद्र चुंबळकर,भारत थोरात,सागर रोहोकले आदींनी परिश्रम घेतले.  सूत्र संचालन प्रांत सेवा सह प्रमुख डॉ प्रदीप उगले तर आभार जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी मानले.


फोटो-विश्व हिंदु परिषदेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रांत सेवाकुंभाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतर राष्ट्रीय अध्यक्ष माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे समवेत विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मंत्री सह सेवा प्रमुख प्रा.मधुकरजी दीक्षित,जैन मुनी पदम ऋषीजी म.सा.अलोक ऋषीज म.सा.,प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,ह भ प अर्जुन महाराज जाधव,प्रांत संघचालक नानासाहेब जाधव,गिरीवरधारी प्रभू (इस्कॉन मंदिर),प्रांत मंत्री विजय देशपांडे,आंतरराष्ट्रीय खेळाडू सौ.अंजलीताई वल्लाकट्टी,सिने कलावन्त सौ.अनुजा कांबळे,प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर,प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण,प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,माजी खासदार दिलीप गांधी महापौर बाबासाहेब वाकळॆ आदी .(छाया -अमोल भांबरकर)

गो पूजन करून विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रांत सेवाकुंभाचा प्रांरभ                       
 धर्माचे रक्षण व संस्कार हि विश्व हिंदु परिषदेची शिकवण-पदम ऋषीजी म.सा. 
नगर -धर्माचे रक्षण व संस्कार हि विश्व हिंदु परिषदेची शिकवण आहे.सेवा कार्य हीच खरी धर्मसेवा व मानवसेवा आहे.”खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे”या प्रमाणे संतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मानव समाज एक आहे.जाती पातीतील दरी कमी करण्याचे कार्य सेवेतून होते.अनेक अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन चांगले संस्कार करून स्वावलंबी बनविण्याचे कार्य विश्वहिंदु परिषद अविरतपणे करीत आहेत.गरजवंतांना सेवेतून शिक्षण,आरोग्य,संस्कार देऊन समाज निर्मितीचे कार्य सेवेतून होत आहे.असे प्रतिपादन पदम ऋषीजी म.सा.
विश्व हिंदु परिषदेच्या सेवा कुंभाचे उदघाटन जैन मुनी पदमरुषीजी म.सा.व अलोक ऋषीजी  म.सा.यांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आले.तसेच विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णूजी कोकजे यांच्या हस्ते गायीला चार देण्यात आला.या प्रसंगी,केंद्रीय मंत्री सहसेवा प्रमुख प्रा.मधुकर दीक्षित,ह.भ.प.अर्जुन महाराज जाधव,प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर,प्रांतमंत्री विजय देशपांडे,प्रांतसेवा प्रमुख दादा ढवाण,प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,संजय मूरदाळे,कोषाध्यक्ष सीए महेंद्र देवी,कमलेशजी पांचाळ,प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे,प्रांत सह सेवा प्रमुख डॉ.प्रदीप उगले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,संजय कुलकर्णी,नाना गोविलकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले.भारतमाता पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी वसतिगृहातील विद्यार्थी,विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचलन प्रांत सह सेवा प्रमुख डॉ.प्रदीप उगले तर आभार जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे यांनी मानले.
फोटो-विश्व हिंदु परिषदेच्या सेवा कुंभाचे उदघाटन जैन मुनी पदमरुषीजी म.सा.व अलोक ऋषीजी  म.सा.यांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आले.तसेच विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णूजी कोकजे यांच्या हस्ते गायीला चार देण्यात आला.या प्रसंगी,केंद्रीय मंत्री सहसेवा प्रमुख प्रा.मधुकर दीक्षित,ह.भ.प.अर्जुन महाराज जाधव,प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर,प्रांतमंत्री विजय देशपांडे,प्रांतसेवा प्रमुख दादा ढवाण आदी.(छाया-अमोल भांबरकर)

नगर -विश्व हिंदू परिषद हि एक सामाजिक सेवाभावी संघटना आहे.परिषदेची स्थापना करताना परिषदेने व्यक्तीच्या कल्याणासाठी,समाजाच्या विकासासाठी,धर्माच्या प्रसारासाठी व राष्ट्राच्या उत्थानासाठी कर्त्यव्यभावनेने देशभर सेवाकार्य सुरु करावे हा आदेश संत महात्म्यांनी दिला.दर ५ वर्षांनी प्रत्येक प्रांतात विश्व हिंदुपरिषदेचा सेवा कुंभ होतआहे.या पूर्वी अखिल भारतीय सेवा संगम गुजरात व दिल्ली येथे संपन्न झाला.२०१४ पासून प्रत्येक प्रांतात दर ५ वर्षांनी सेवा कुंभ साजरा करण्यात येतो.या वर्षी नगर येथे होणार आहे. विश्वहिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णूजी सदाशिव कोकजे यांची प्रमुख उपस्थितीनगर जिल्ह्यात विविध सेवा कार्याची वाढ व्हावी यासाठी सेवा कुंभाचे आयोजन विश्वहिंदू परिषदेतर्फे करण्यात येतआहे.असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे प्रांत सेवा प्रमुख दादाराम ढवाण यांनी केले.
केडगाव देवीरोड येथील डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुल,बी एड.कॉलेज येथे ८ व ९फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचा पश्चिम महाराष्ट्राचा सेवा कुंभाचे आयोजन करण्यात आलेआहे.सेवाकुंभाच्या समारोप प्रसंगी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता विश्वहिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णूजी सदाशिव कोकजे व केंद्रीय मंत्री सह सेवा प्रमुख मधुकररावजी दीक्षित मार्गदर्शन करणारआहेत.अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे प्रांत सेवा प्रमुख दादाराम ढवाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेत जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,बजरंगदल जिल्हाध्यक्ष गौतम कराळे,शहर मंत्री अनिल देवराव,शहर सहमंत्री राजेंद्र चुंबळकर,भारत थोरातआदी उपस्थित होते.

विश्व हिंदुपरिषदेने गेल्या ५६ वर्षात परिषदेच्या सेवाभावी कार्य कर्त्यांनी समाजच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी हजारो सेवा प्रकल्पातून दुर्गम दऱ्याखोऱ्या,जंगले,वने,पहाडी तसेच ग्रामीण विभागीतलं लाखो अभावग्रस्त बांधवांच्या जीवनात आशेचा किरण प्रजवलीत करून स्वाभिमानी स्वावलंबी समाज निर्माण केलाआहे.वाडी वस्ती,आदिवासी पाड्यावर एकल विद्यालये, बालवाडी ,आरोग्य दूत योजना,विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहे ,संस्कार शाळा,फिरते आरोग्य केंद्र,मोफत औषध उपचार केंद्रे, स्वयंरोजगार केंद्र ,ग्रन्थालय, रुग्णवोपयोगी साहित्य केंद्र,आमुबलस सेवा,दुष्काळात चारा वाटप केंद्र,गरजूंसाठी मोफत अंत्य संस्कार केंद्रअश्या विविध पूर्ण सेवा प्रकल्पातून कार्य चालू आहे.महाराष्ट्रात ४५३ स्थायी स्वरूपाची सेवा कार्य परिषदेतर्फे चालविण्यात येत आहेत. विश्व हिंदुपरिषद पश्चिम महाराष्ट्रातील प्रांत व नगर जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या सहभागातून सेवा कार्याचे माहितीचे प्रदर्शन नगर शहरातील नागरिकांसाठी रविवार दिनांक ९ फेब्रुवारी सकाळी १० ते ८ या वेळेत खुले आहेत तरी या प्रदर्शनीस भेट देऊन सेवा कार्याची माहिती घ्यावी असे आवाहन विश्व हिंदुपरिषेदचे प्रांत सेवा प्रमुख दादाराम ढवाण यांनी केलेआहे.

पश्चिम महारष्ट्रात १० वसतिगृहातून ५४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आषाढीवारीच्या काळात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी चार प्रमुख मार्गावर मोफत दिली जाणारी संपूर्ण आरोग्य सेवा हा तात्कालिक सेवा प्रकल्प लक्षणीय आहे.संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी (आळंदि),संत तुकाराम महाराज दिंडी (देहू),संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर (नाशिक),संत एकनाथ महाराज(पैठण)दिंडीतील वारकरी आरोग्य सेवा पंढरपूर पर्यंत मोफत दिली जाते.या आरोग्य सेवेसाठी विश्व हिंदुपरिषदेचे कार्यकर्ते सेवा देत आहेत. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील विद्यार्थी वसतिगृहात ४० विद्यार्थी शिक्षण घेतआहेत.संस्कारयुक्त श्लोकांचे पाठांतर,नियमित शाळे अभ्यास नित्य व्यायाम व खेळांचा सराव नियोजन बद्ध दिनक्रम यामुळे या वस्तीगृहात विदयार्थ्यांची सर्वांगीण उन्नती होऊन स्वाभिमानी स्वावलंबी घडण्याची प्रक्रिया या प्रकल्पाद्वारे होतआहे.गेल्या ३५ वर्षात १००० पेक्षा अधिक विद्यार्थी संस्कारयुक्त शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात १०० पेक्षा अधिक सेवा प्रकल्प चालविण्यात येत आहेत.यापैकी बालिकाश्रम विद्यार्थी वसतिगृहे या प्रकल्पात शिक्षण संस्काराचे धडे घेणाऱ्या बालकांचे संमेलन सेवा कुंभा नावाने संपन्न होत आहेत संमेलनात प्रकल्पातील निवडक विद्यार्थी,सेवा प्रकल्प चालविणारे सेवा भावी कार्यकर्ते ,विविध न्यासांचे विश्वस्त व सहयोगी संस्थेचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध गुण दर्शन सादर करणार आहेत.

प्रत्येक प्रकल्पावर परिषदेचे निस्वार्थी निष्ठावान प्रसिद्धी परामुख असे कार्यकर्ते संपूर्ण आयुष्य प्रकल्प विकासासाठी व्यथित करत आहेत.अश्या तपस्वी त्यागी कार्यकर्त्यांचे कार्य समाजाला समजावे त्यांच्या कर्म योगातून समाजाने प्रेरणा घ्यावी .विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार समाजाने प्रत्यक्ष पाहावे यासाठी पश्चिम महाराष्ट्रात चालणाऱ्या सेवा प्रकल्पातील विविध घटकांना एकत्र आणून समाजाला सेवा दर्शन घडविणाऱ्या सेवा कुंभाचे आयोजन नगर येथे करण्यात आले आहे.

Back To Top