विश्व हिंदु परिषद उदगीर तर्फे मोफत पाणी पुरवठा

उदगीर : विश्व हिंदु परिषद उदगीर प्रखंड ग्रामीण या भटक्या समाजासाठी मदतीचा हात पुढे करून धावली आहे.मराठी नविन वर्ष अर्थात गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने मोफत टॅंकर नी पाणी पुरवठा करण्यात आला. याचे उदघाटन विश्व हिंदु परिषदेचे विभागीय संघटन मंत्री संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री विलासजी खिंडे ,विश्व हिंदु परिषदेचे उदगीर प्रखंड( ग्रामीण )चे अध्यक्ष श्री गंगाधर मुंडे सर,तसेच बजरंग दल संयोजक सचिन नाटकरे आदि उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर-बाहत्तर वर्ष झाली आहेत परंतु अजून ही अनेक भटक्या समाजाचे नागरिक शिक्षण, निवारा,आरोग्य विज व शासकीय योजनेपासून वंचित राहिले आहेत. नेमक्या अशाच अनेक सुविधा पासून दूर वंचित असलेली उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथील वस्ती होय .येथे कसल्याच प्रकारची सुविधा नाही अशा लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी सकाळी वस्ती सोडावी लागते सध्या दुष्काळाच्या तिव्र झळा जाणवत आहेत, दूर-दूरवर पाणी उपलब्ध नाही. पैसे वाले लोक पैसे देऊन पाणी विकत घेत आहेत पण या वस्तीवरील लोकांना पोट भरण्यासाठी वण-वण फिरावे लागते तेंव्हा हे लोक पैसे देऊन पाणी विकत घेवू शकत नाहीत व पाण्याशिवाय जगूही शकत नाही. कारण ना येथे नळ योजना आहे ना येथे शासनाचे टॅंकर योजना आहे.
अशा बिकट परिस्थितीत हा पाणी पुरवठा 45-ते 60 दिवस सतत केला जाणार आहे. यापूर्वी विश्व हिंदु परिषद तर्फे येथील बालकासाठी मांगूळकर बाल वाटिका उघडून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या वस्तीवरील लोक अतिशय आनंदी असून विश्व हिंदु परिषदेचे धन्यवाद मानत आहेत

Back To Top