दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग पश्चिम महाराष्ट्र प्रांत

विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग १७ मे २०१८ ते २४ मे २०१८ या कालावधीत मालेगाव (नाशिक) जिल्ह्यातील येवलाया गावी कार्यालयाच्या विस्तीर्ण जागेत यशस्वीरित्या संपन्न झाला. वर्गाची सुरवात दिनांक १७मे रोजी दुपारपासून येणाऱ्या दुर्गांच्या आगमनाने झाली. रात्री ७ वाजता सत्संगाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
दिनांक १८ रोजी सकाळी १० वाजता वर्गाचे विधिवत उदघाटन पर पडले. उदघाटनप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री एकनाथराव शेटे सर,प्रांतमंत्री श्री विजयराव देशपांडे ,सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञडॉ सौ. कविता दराडे, प्रांत प्रशिक्षण प्रमुख श्री रामभाऊ महाजन ,प्रांत दुर्गावाहिनी संयोजिका अँड मृणालिनी पडवळ व वर्ग कार्यवाहिका सौ. भक्ती साळवी,मालेगावजिल्हा अध्यक्ष श्री अनिरुद्धपटेल, नाशिक विभाग मंत्री श्री शैलेशजी भावसार, प्रांत महिला विभाग पालक श्री पांडुरंग फाटक मंचावर उपस्थित होते . दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली. याप्रसंगी प्रांत अध्यक्ष श्री एकनाथराव शेटे सरयांनी रामजन्मभूमी आंदोलनाची सविस्तर माहिती सांगितली व अश्याप्रकारच्या अभियानात दुर्गावाहिनीच्या कामाचे महत्व पटवून दिले. विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती दिली. या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, परिचय व प्रास्ताविक प्रांत दुर्गावाहिनी सहसंयोजिका सौ, मीनलताई भोसले यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ सौ कविता दराडे म्हणाल्या , महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे हाच महिलांच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. स्त्री शारीरिकदृष्ट्या, संरक्षणक्षम, आणिआर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास तिचा छळ करण्यास कुणीही धजावणार नाही. वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताध्यक्ष श्री एकनाथराव शेते म्हणाले हिंदू समाजाने जातीपाती विसरून एक होण्याची गरज आहे.समर्थ भारताच्या निर्मितीसाठी हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी प्रत्येक हिंदूने ओळखून वागण्याचे त्यांनी आवाहन केले.
या वर्गात केंद्रीय सहमंत्री व सत्संग प्रमुख मा. श्री दादा वेदक यांचे सामाजिक समरसता ,महाराष्ट्र, बंगलोर व आंध्रप्रदेश मातृशक्ती संयोजिका सुश्री किशोरीताई कोळेकर यांचे स्त्री सन्मान , मुंबई क्षेत्र मंत्री श्री शंकरजी गायकर यांचे उदयमानभारत व युवक,श्री संजय जैन यांचे लव्ह जिहाद, प्रांत प्रशिक्षण प्रमुख श्री रामभाऊ महाजन यांचे कार्यकर्ता व संघटन या विषयावर बौद्धिक झाले .
प्रविणता सत्रामध्ये केशभूषा , नृत्य , रांगोळी, स्वसंरक्षण,व्यक्तिमत्व विकासइत्यादी विषयांवर मार्गदर्शन झाले. कृतीसत्रामध्ये संस्कार वर्ग , शक्ती साधना केंद्र , आंदोलन,टाकाऊमधून टिकाऊ, कोपरा सभा इत्यादी विषयांवर दुर्गांकडून कृती करून घेतली. चर्चा गट या सत्रामध्ये उपभोक्तावाद,स्वदेशी, भारतीय सण व विज्ञान , आदर्श हिंदू कुटुंब व हिंदू घर , सोशल मिडिया , इत्यादी विषयांवर दुर्गांबरोबर चर्चा झाली . याशिवाय रोज रात्रीच्या रंजन सत्रामध्ये पोवाडा , पुण्यभूमी भारत इत्यादी विषयांवर माहितीपट , विविध गुणदर्श या विषयांवर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
प्रातः स्मरणाने दिवसाच्या सत्राची सुरवात होत होती सकाळच्या शारिरीक सत्रात मैदानावर योग, दंड, निःयुद्ध , रायफल व पिस्तुल, समता, या विषयांवर प्रशिक्षण गणशः दिले जाई. यानंतर पाठांतर सत्र त्यानंतर बौद्धिक सत्र दुपारी कृती सत्र , चर्चा सत्र , सत्संग सायं मैदानावर प्रशिक्षण व खेळ होत. रात्री रंजन सत्र आयोजित केले जात होते. अशी वर्गाची दिनचर्या होती. दिनांक २३ मे रोजी सायं ७ ते ९.३० या वेळात येवला शहरातील बाजारपेठ व नागरी वस्तीमधून ढोल ताशाच्या गजरात अतिशय उत्साहात शोभायात्रा आयोजित करण्यात आली . याप्रसंगी चौकाचौकातून दुर्गांचे दंड , तलवार यांचे नेत्रदीपक प्रात्याक्षिके करण्यात आलीत . या शोभायात्रेचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले . चौकाचौकातून नागरिक व व्यापाऱ्यांनी पेय पानाची व्यवस्था केली होती.
दिनांक २४ मे रोजी सांगता कार्यक्रमात सकाळी संकल्प यज्ञ व दीक्षाग्रहण कार्यक्रम झाला. सायंकाळी वर्गाचा जाहीर समारोप प्रसंगी दिलेल्या शारिरीक प्रशिक्षण विषयांचे – दंड , निःयुद्ध , मनोरे, तलवार बाजी व योगासने यांची प्रेक्षणीय प्रात्याक्षिके झाली. समारोप प्रसंगी व्यासपीठावर प्रांत संघटनमंत्री श्री भाऊराव कुदळे , विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रशिक्षण प्रमुख श्री रामभाऊ महाजन ,प्रांत दुर्गावाहिनी संयोजिका अँड मृणालिनी पडवळ व वर्ग कार्यवाहिका सौ. भक्ती साळवी,मालेगावजिल्हा अध्यक्ष श्री अनिरुद्ध पटेल, नाशिक विभाग मंत्री श्री शैलेशजी भावसार, प्रांत महिला विभाग पालक श्री पांडुरंग फाटक मंचावर उपस्थित होते. समारोप प्रसंगी मा. भाऊराव कुदळे यांनी ज्या नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे कौतुक केले. मार्गदर्शन करतांना त्यांनी अश्याप्रकारच्या प्रशिक्षण वर्गाच्या आवश्यकतेविषयी सविस्तर व सोदाहरण स्पष्ट केले. प्रशिक्षित दुर्गांना जबाबदारी घेऊन कार्य कसे करावे याचे मार्गदर्शन केले. अश्याप्रकारे अतिशय उत्साहात वर्ग संपन्न झाला.
या वर्गामध्ये प्रांतातून २२० दुर्गा व २० शिक्षिका उपस्थित होत्या . त्यांची जिल्हाशः वर्गवारी पुढीलप्रमाणे नाशिक – ४६, मालेगाव – ८२, श्रीरामपूर-१३नगर- ४ , चिंचवड – २५, बारामती -११ , सोलापूर- १६ , सांगली- १ , सातारा – २ , हडपसर –६ , सिंहगड -१ , कसबा – २, छत्रपती संभाजी -५, पर्वती –१, विद्यापीठ – १, येरवडा – २ श्रेणीशः वर्गवारी वर्गामध्ये पदवी वद्विपदवीधर -१९, पदविका – ५पदवी व पदविकाशिक्षण घेणाऱ्या- ३९,९ वी व१०वि – ६८,११ वी व१२ वि – ६०,८ वी पर्यंत – २९होत्या.या वर्गाचे संयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गावाहिनी संयोजिका अँड मृणालिनी पडवळ व मातृशक्ती / दुर्गावाहिनी पालक श्री पांडुरंग फाटक यांनी केले. वर्ग कार्यवाहिका म्हणून सौ. भक्ती साळवीचिंचवड , मुख्यशिक्षिका म्हणून कु. प्रांजल कुंदेल व सहमुख्यशिक्षिका म्हणून कु. मयुरी वाघमारे यांनी जबाबदारी पार पडली. नाशिक विभाग मंत्री अँड श्री शैलेशजी भावसार यांचे मार्गदर्शनात मालेगाव जिल्हा व येवला प्रखंडातील कार्यकर्त्यांनी व्यवस्था सांभाळली.
या वर्गासाठी येवला व परिसरातील व्यापारी , व्यावसायिक, अन्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले . येवला येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांनी सर्व व्यवस्थांसाठी मोलाचे सहकार्य केले.
संकलन –
विवेक सोनक
पश्चिम महारष्ट्र प्रांत प्रचार सहप्रमुख

 

 

Back To Top