सिंहगडावर प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

हर हर महादेव….जय भवानी, जय शिवराय….. धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराज की जय..चा अखंड जयघोष…. ढोल-ताशा आणि पारंपारिक वाद्यांचा गजर…. रांगोळ्यांच्या पायघड्या… भगवेझेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर होणारी पुष्पवृष्टी… अश्या चैतन्यमय वातावरणात शाहिरी निनादासह सिंहगडावर प्रथमच शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण साजरा झाला. इतिहासात घडलेला हा सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ शीतल मालुसरे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पुणे महानगराच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीरछत्रपती संभाजी महाराजजयंती दिनानिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी आमदार भीमराव तापकीर, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, पुणे महानगर मंत्री किशोर चव्हाण , महानगर सहमंत्रीश्रीकांत चिल्लाळ व तुषार कुलकर्णी , डॉ शीतल मालुसरे, अजित आपटे, शाहीर हेमंत मावळे, शाहीर श्रीकांत रेणके, नगरसेविका वृषाली चौधरी, प्रसन्न जगताप,रमेश कोंडे, लाला जवळकर, सचिन पासलकर, नवनाथपारगे, पुणे महानगर बजरंग दल सहसंयोजक नितीन महाजन, केतन घोडके,श्रीपाद रामदासी, संपतचरवड, शरद जगताप, राजेश जाधव, अमर सातपुते, दत्ता तोंडे आदी उपस्थित होते.

अभिवादन सोहळ्याची सुरवात राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून ते सिंहगड वाहनतळापर्यंत विराट दुचाकी रँलीने करण्यात आली. त्यानंतर सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या पालखीची ढोल-ताशांच्या आणि शंखनादाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ शीतल मालुसरे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी शाहीर श्रीकांत रेणके यांनी शाहिरीतून शिवरायांना मानवंदना दिली. तसेच सिंहगडावरील मंदिरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना विश्व हिंदू परिषदेचेपुणे महानगर मंत्री किशोर चव्हाण म्हणाले की, नरवीरतानाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत जीवाची बाजी लावून हा गड स्वराज्यात परत आणला. त्यांना वंदन करण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी पुणे महानगर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या नेतृत्वातशिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. इतिहासातील शिवराज्याभिषेकाचा हा सुवर्णक्षणमहाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांवर उत्साहात साजरा केला पाहिजे.सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे, मात्र स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची एकही प्रतिमा गडावर नाही.त्यामुळे सर्वांकरिता दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची मेघडंबरी सहित भव्य प्रतिमा सिंहगडावर बसविण्यात यावी. सिंहगडासह सर्वच गडकिल्ल्यांवर अश्या प्रतिमा बसविण्यात याव्यात याकरिता महाराष्ट्र शासन, पुरातत्वविभाग व संबंधित खात्यांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली. साईनाथ कदम, समीर रुपदे, धनंजय गायकवाड, सचिन लोहोकरे, योगेश देशपांडे, संजय पवळे, नानाजी क्षीरसागर, रवी बोडके, सचिन गुळाणीकर, विशाल कडू आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

संकलन –

विवेक सोनक

प्रांत सहप्रचारप्रमुख

Back To Top