देवगिरी – संभाजी नगर (Devagiri – Sambhaji Nagar)

क्षेत्र (Kshetra) :
 • प्रांत भौगोलिक (Geographical)

  विभाग

  जिले

  जळगाव जळगाव भुसावळ नंदुरबार धुळे
  संभाजीनगर संभाजीनगरशहर संभाजीनगरग्रामीण जालना परभणी
  नांदेड नांदेड किनवट हिंगोली
  लातूर लातूर धाराशीव बीड
 • कार्य विभाग (Dimensions )
  • सेवा विभाग (Seva Vibhag) : सेवा प्रकल्प (Service Projects)

   विश्व हिंदू परिषद  ‘महाराष्ट्र प्रदेश’ चार प्रांत आहेत.  त्यातील मराठवाडा व खान्देश मिळून देवगिरी प्रांत होतो.   ही रचना २००२ साली अस्तित्वात आली.  तत्पूर्वी हा भाग  ‘महाराष्ट्र प्रदेश’  या प्रांताचा एक भाग म्हणूनच काम करीत होता.  समग्र हिंदू समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विश्व हिंदू परिषद सामाजिक, शैक्षणिक, गोरक्षण, जलसंधारण, मतांतरण, एकल विद्यालय, आरोग्यसेवा, रोजगार यासारख्या विविध क्षेत्रात सेवाकार्य करीत आहे.
   देवगिरी प्रांत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.  संत एकनाथ महाराजांचे पैठण, संत ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ गाव आपेगाव, संत मुक्ताईचे समाधीस्थान मुक्ताईनगर, संत नामदेव महाराजांचे गाव नर्सी नामदेव, संत रामदासस्वामींचे जन्मगाव जांब ही तीर्थक्षेत्रे याच प्रांतात येतात.  वारकरी संप्रदायाचे मोठे काम येथे आहे.  शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांचे समाधीस्थळ नांदेड येथे आहे.  भौगोलिक दृष्ट्या देवगिरी प्रांताला ऐतिहासिक वारसा आहे.  छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.  एकेकाळी अजिंक्य असलेला देवगिरी किल्ला या प्रांतात आहे.  धार्मिक दृष्ट्या घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंगे आहेत.  माहूरगडासारखे शक्तीपीठ याच प्रांतात नांदेड जिल्ह्यात आहे.  संभाजीनगर (औरंगाबाद) ही प. पू. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी राहिली आहे.  जागतिक वारसा असलेली अजिंठा, वेरूळ ही लेणी या प्रांतात येतात.
   विश्व हिंदू परिषद गेल्या ५० वर्षांपासून मुख्यत: वनवासी बांधवांसाठी धडगाव जि. नंदुरबार येथे वसतीगृह चालविते. त्याशिवाय वसमत जि. हिंगोली, संभाजीनगर शहर, उदगीर जि. लातूर येथे वसतीगृहे आहेत.  महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा परिक्रमा मार्गावर दोन ठिकाणी निवास-भोजन व्यवस्था, आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत फिरता दवाखाना व पिण्याच्या पाण्याची सुविधा, दुष्काळी परिस्थितीत गोधनासाठी चारा छावण्या, विविध यात्रांप्रसंगी प्रसाद वाटप यासारखे उपक्रम चालतात.  परभणी जिल्ह्यात राणीसावरगाव येथे नदीचे खोलीकरण, केदारेश्वर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम ही कामे वैशिष्ट्यपूर्ण ठरली.  सेंद्रीय शेती व त्यासाठी गोधनाचा उपयोग याबाबत शेतकरी बांधवांचे प्रशिक्षण हा विषय प्राधान्याने घेत आहोत.
   समाजाची आवश्यकता लक्षात घेता हे काम अगदी अल्प आहे याची आम्हाला जाणीव आहे.  जसजसा समाजातून प्रतिसाद वाढत आहे तसतशी या कामात वाढ करण्याची योजना आहे.    यासाठी प्रांताची सेवा विभागाची समिती आहे.  श्री. विवेक हंबर्डे सध्या या समितीचे अध्यक्ष,श्री रामदास लहाबर सेवा प्रभारी आहेत, नंदुरबारचे प्रा. राजाराम माळी प्रांताचे सेवाप्रमुख आहेत तर लातूरचे संतोष कुलकर्णी सहसेवाप्रमुख आहेत.

   सेवा विभाग : सेवा प्रकल्प

   क्र. जिला सेवा प्रकल्प नाम सेवा कार्य
   नंदुरबार वनवासी विद्यार्थी वसतीगृह (धडगाव) वसतीगृह
   संभाजीनगरशहर जनुभाऊ रानडे विद्यार्थी वसतीगृह वसतीगृह
   हिंगोली साधूमहाराज विद्यार्थी वसतीगृह (वसमत) वसतीगृह
   लातूर समर्थ छात्रावास (उदगीर) वसतीगृह

   नंदुरबार माँ नर्मदा सेवा समिती (मोळगी व वडथळी) परिक्रमावासी भोजन, निवास

   माँ नर्मदा सेवा समितीबन – मोलगी , वडफळी
   व्यक्तीचा सुष्टीशी संबंध हे हिंदू संस्कृतीचे मर्म आहे .येणाऱ्या प्रत्तेक अडथळ्याला वळसा घालत आपल्या काठावर एक समृद्ध संस्कृती विकसित करणाऱ्या नद्यांना आपण मातेइतके स्थान दिलेले आहे. नर्मदा अशीच एक पवित्र नदी नर्मदा परिक्रमा हा सुष्टीशी संवाद,शक्तीची पूजा, अंतर्मुख होऊन मनाची विशालता वाढविण्याचा अनुभव असतो. या नर्मदा परिक्रमेचा मार्ग देवगिरी प्रांतातील नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातून जाते. सातपुड्याच्या रांगांमुळे निसर्गाची देणगी लाभलेल्या या भागातून भाविक नर्मदा परिक्रमा करतात.
   या भागात बऱ्याच अंतरात चहा, पाणी, नाश्ता अशी काहीच सोय नसते. मुक्काम पडला तर निवासाची फारशी रचना नाही.हि स्थिती लक्षात घेऊन सौ.ज्योत्स्ना ताई ठासळकर यांच्या प्रेरणेने विश्व हिंदू परीषदेने माँ नर्मदा सेवा समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या वतीने कार्तिक शुद्ध एकादशी ते आषाढी एकादशी दरम्यान येणाऱ्या नर्मदा भक्तांना भोजन आणि निवासाची व्यवस्था केली जाते समितीतर्फे मोलगी व वडफळी या अक्कलकुवा तालुक्यातील गावात अन्नदान आणि निवास व्यवस्था केली जाते समितीतर्फे मोलगी येथे स्वताच्या मालकीची जागा घेऊन आता बांधकाम सुरु केले आहे मोलगी येथे माँ नर्मदेचे मंदिर बांधकाम सुरु केले आहे .

   दत्त मंदिर न्यास नवापूर
   डॉ. चिमणाजी भांगारे हे नवापूर येथे वैद्यकीय अधिकारी होते. ते दत्त भक्त होते. पु.नारायण महाराज केलगावकर हे त्यांचे गुरु होते. गुरुकृपेने डॉ. भांगारे यांनी नवापूर येथे दत्तमंदिर बांधले १९८२ साली त्यांनी हे मंदिर विश्व हिंदू परिषदेला सुपूर्त केले, आता या मंदिराची व्यवस्था विश्व हिंदू परिषदेतर्फे पहिली जाते . या मंदिरात नित्य सकाळी, दुपारी, व संध्याकाळी पूजा अर्चा केली जाते. या न्यासा तर्फे आरोग्य सेवा हि सुरु करण्यात आली आहे. दर सोमवारी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आसतो. या न्यासाचे अध्यक्ष  विवेक दगडू सोनार हे आहेत. न्यासतर्फे पंचवार्षिक नित्य पूजा यजमान योजना सुरु केली आहे. भाद्र्पद गुरुपोर्णिमेला पालखी सोहळा आसतो. आठ दिवस नाम सप्ताहा केला जातो. गुजरातमधील कलोद्चे दत्तभक्त श्री रमेशभाई पटेल यांच्याकडून प्रसाद दिला जातो. माघ शुद्ध त्रयोदशीला महोत्सव असतो. गेले ८६ वर्षे या मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक एकत्रीकरणाचे कार्यक्रम मंदिराच्या सभागृहात घेतले जातात.

   विश्व हिंदू परिषद संचलित सावित्रीबाई फुले मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र
   अर्थीकदृष्ट्या दुर्बल असणा-या माहिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून विश्र्व हिंदू परिषद महानगर संभाजीनगर (औरंगाबाद) ने सेवा आयामाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र संभाजीनगरातील  विश्र्वकर्मा प्रखंडात करण्याचा विचार केला. त्या दृष्टीने परिसरातील गरजू महिलांचे सर्वेक्षण केले. विशेषतः कामगार, मजूरी करणारे, धूणे-भांडी करणाऱ्या महिला, ईत्यादी वर्गातून 47 महिला पहिल्या बैठकीस हजर होत्या. 17 नोव्हेंबर 2017 रोजी “सावित्रीबाई फुले शिलाई प्रशिक्षण केंद्र” या नांवे वि. हि. प. ने स्वतःच्या वास्तूत श्रीमती.उमा अग्रवाल यांच्या शुभहस्ते चालू केले. सुरुवातीला दोन मशिन्स देणगीतून मिळाल्या व पाच महिलांसाठी केंद्र चालू केले. अवघ्या काही महिन्यातच महिलांची प्रशिक्षणासाठी येण्याची संख्या वाढल्यामुळे ४० महिलांची एक बॅच सुरु झाली.महिलांची वाढलेली संख्या लक्षात घेवून ईमारतीच्या गच्चीवर मोठे शेड ऊभारुन प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली.विस्तारलेल्या प्रकल्पाच्या कामाचे ऊदघाटन कामाचे विहिंप  महामंञी मा. श्री विनायकराव जी देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
   शिलाई प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा  असून आत्तापर्यंत १५५ महिला प्रशिक्षित झाल्या आहेत. गरजू महिलांना एक शिलाई मशीन तथा कामही देण्याचा प्रयत्न आहे. सध्या आठ मशिन्सवर १२ महिला प्रशिक्षण घेत आहेत.
   ज्या महिला आपल्या संस्थेतून प्रशिक्षण घेवून गेल्या त्यांनी त्यांच्या वस्तीत चरीतार्थाचे साधन म्हणून कपडे शिवून देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. सदर सेवा प्रकल्प महानगर मंत्री श्री शैलेश पत्की व विश्र्वकर्मा प्रखंड मंत्री श्री ज्ञानदेव पाटील हे पाहातात आणि सौ. वैशाली तेलवाडकर ह्या शिक्षिका म्हणून काम पाहतात.

   पाचोरा आरोग्य सेवा केंद्र
   समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी सेवा प्रकल्प उभे राहत असतात. पाचोरा गावातील वस्तीमध्ये गरीबातल्या गरीब बांधवाना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे असा विचार करून विश्व हिंदू परिषदेतर्फे आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले. समाजाच्या सहकार्यानेच या आरोग्य केंद्राचा खर्च पूर्ण केला जातो. डॉ. एस. एन. शर्मा हे दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत रुग्णांची तपासणी करून औषधे लिहून देतात. तपासणीसाठी अवघे दोन रुपये शुल्क असते आणि गावातील औषध दुकानातून औषधे मोफत दिली जातात. याशिवाय आळंदी ते पंढरपूर या दिंडीत दोन टँकर पाण्यासाठी पंधरा दिवस देण्यात आले होते.

  • सत्संग (Satsang)
  • सामाजिक समरसता (Samajik Samrasata)
  • प्रचार प्रसार (Media and Publications)
  • बजरंग दल (Bajrang Dal)
  • दुर्गावाहिनी (Durgavahini)
  • मातृशक्ति (Matrushakti)
  • धर्म प्रसार (Dharm Prasar)
  • गोरक्षा (Gau Raksha)
  • धर्माचार्य सम्पर्क (Dharmacharya Sampak)
  • मठ मंदिर (Mutt – Mandir)
  • संस्कृत (Sanskrit)
 • संपर्क सूत्र (Contact Us)

  विश्व हिंदूपरिषद कार्यालय, उदयकॉलनी, खडकेश्वर,
  संभाजीनगर (औरंगाबाद) ४३१००१
  महाराष्ट्र.

Contact No : ०२४०-२३२१०९०
Email :
Back To Top