पश्चिम महाराष्ट्र – पुणे (Paschim Maharashtra – Pune)

क्षेत्र (Kshetra) :
 • प्रांत भौगोलिक (Geographical)

  विभागशः व जिल्हाशः रचना

  सोलापूर

  सोलापूर

  चिंचवड

  बारामती

  पंढरपूर

  कोल्हापूर

  कोल्हापूर

  सांगली

  सातारा

  नाशिक

  नाशिक

  मालेगाव

  नगर

  श्रीरामपूर

  पुणे महानगर

  पूर्व पुणे

  पश्चिम पुणे

  उत्तर पुणे

  दक्षिण पुणे

  मध्य पुणे

 • कार्य विभाग (Dimensions )
  • सेवा विभाग (Seva Vibhag) : सेवा प्रकल्प (Service Projects)

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, अस्तित्वाने आणि तेजस्वी विचाराने पवित्र व प्रेरितअसलेला भूभागडोंगर दऱ्यानी निसर्गाच्या संपन्नतेनी नटलेला आहे. साधारण ३ कोटी लोकसंख्या असलेल्याया प्रदेशात वनवासी बांधवांचे प्रमाण दहा टक्के आहे. तर वस्ती क्षेत्रातील २.५ टक्के बांधव राहतात. सामाजिक विषमतेचे प्रमाणही मोठे आहे. ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य क्षेत्रातही मोठ्या अभावाची स्थिती आहे. सामान्य गरजांच्या पुर्ती अभावी धर्मांतराचे प्रमाणही वाढत चालले आहे. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी  या सर्व गोष्टींचा विचार करून या प्रांतात शिक्षण आरोग्य स्वयंरोजगार या क्षेत्रात अनेक सेवा प्रकल्प सुरु केले आहेत. फिरते आरोग्य केंद्र ,आरोग्य शिबिरे, यात्राकाळातभक्तांना आरोग्य सुविधा देणे, रुग्णोपयोगी
   साहित्य केंद्रे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासकेंद्र, बालकांसाठी सर्व प्रकारच्या मोफत लसीकरण उपक्रम असे अनेक आरोग्यविषयक प्रकल्प चालवले जात आहेत. साधारण ७५ हजार बालके व एक लाख गरजू रुग्ण या आरोग्य सेवेचा दरवर्षी लाभ घेत आहेत.
   डोंगर भागातील वनवासी विद्यार्थ्यांकरिता चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी संस्काराबरोबरच आपला औपचारिक शिक्षणक्रमही पुर्ण करीत आहेत. शिलाई प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, तंत्र शिक्षण असे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेणारे २०० युवक-युवती स्वताच्या पायावर उभे राहत आहेत. तर  वारकरी कीर्तन प्रशिक्षण केंद्रही परिषदेतर्फे चालवले जात आहे.
   एकल विद्यालये, संस्कार शाळा, संस्कार केंद्रे, बालवाड्या, या माध्यमातून मूळ भारतीय संस्काराचे  बीज बालकांमध्ये निर्माण केले जात आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना प्रशस्त अभ्यासिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर वाचनाची आवड वाढवणारे व समाज जागृतीचे उपक्रम घेणारे भव्य ग्रंथालय या प्रांतात चालवले जात आहे. ग्राम स्वच्छता स्पर्धा, वृक्षारोपण, कुटुंब प्रबोधन समाजाची गरज लक्षात घेऊन अंत्यसंस्कार केंद्र अशी अन्य सेवाकार्याही सुरु आहेत. ही सर्व सेवाकार्य चालवण्यामागील परिषदेचा मुख्य उद्देश्य आहे; एकरस स्वाभिमानी सशक्त देशभक्त हिंदू समाज निर्माण व्हावा. कोणी हिंदू अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये; आणि त्यांनी लाचार होऊन
   धर्मांतर करू नये.
   प्रांतात चालणारी विविध सेवकार्याची सविस्तर माहिती

   क्रमांक जिल्हा सेवाकार्य का नाम सेवाकार्य प्रकार
   नाशिक कन्या छात्रालय (हरसूल ) वसतिगृह
   नाशिक वनवासी विद्यार्थी वसतिगृह (घोटी ) वसतिगृह
   चिंचवड धर्मगंगा सार्व.वाचनालय (चिंचवड) वाचनालय
   चिंचवड कै.गोपाळ देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह (वडगाव) वसतिगृह
   चिंचवड वनवासी विद्यार्थी वसतिगृह (राजगुरुनगर) वसतिगृह
   कोल्हापूर पु.शी.तथा काका आठवले विद्यार्थी वसतिगृह (तारळे) वसतिगृह
   सिंहगड (पुणे ) निरामय लसीकरण प्रकल्प (पुणे महानगर ) लसीकरण(० ते ६)
   चिंचवड संजीवनी मुलींचे वसतीगृह वसतिगृह
   संभाजी(पुणे) श्रीराम समाजसेवा न्यास (कोथरुड) बालवाडी
   नाशिक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र (हरसूल ) रोजगार
   नाशिक स्नेहवर्धिनी विद्यार्थीनि वसतिगृह (मखमलाबाद) वसतिगृह
   नाशिक स्नेहवर्धिनी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र (मखमलाबाद) रोजगार
   नाशिक श्रीराम मंदिर (हरसूल ) संस्कार
   मालेगाव रुग्णोपयोगी साहित्य केंद्र ( कळवण ) रुग्णोपयोगी साहित्य केंद्र
   चिंचवड स्व.प.वा.तथा दादा चांदेकर सार्व.वाचनालय (वडगाव) वाचनालय
   चिंचवड स्व.अशोकभाई शहा अभ्यासिका (वडगाव)  अभ्यासिका
   चिंचवड भाऊ आठवले पादत्राण सेवा (चिंचवड) चप्पल स्टँड
   चिंचवड स्व.संभाजी भुजबळ विद्यार्थी वसतिगृह (शिक्रापूर) वसतिगृह
   चिंचवड गोपाळ बालक मंदिर (वडगाव) बालवाडी
   संभाजी(पुणे) श्रीराम रुग्णोपयोगी साहित्य केंद्र (कोथरुड) रुग्णोपयोगी साहित्य केंद्र
   संभाजी(पुणे) नादब्रम्ह सुगम संगीत विद्यालय (कोथरुड) संगीत विद्यालय
   संभाजी(पुणे) मधुकुसुम आपटे न्यास अभ्यासिका   (पटवर्धन बाग ) अभ्यासिका
   संभाजी(पुणे) मधुकुसुम आपटे न्यास रुग्णोपयोगी साहित्य केंद्र  (पटवर्धन बाग ) रुग्णोपयोगी साहित्य केंद्र
   सिंहगड (पुणे) निरामय किशोरी शक्ती  प्रकल्प (पुणे महानगर ) किशोरी शक्ती  प्रकल्प
   सिंहगड (पुणे) निरामय रूबेलो लसीकरण प्रकल्प (पुणे महानगर ) रूबेलो लसीकरण प्रकल्प
   नगर धुंडा महाराज विद्यार्थी वसतिगृह (शेवगाव ) वसतिगृह
   नगर स्व. अशोकजी सिंघल ग्रामीण रुग्णालय(शेवगाव ) रुग्णालय
   कोल्हापूर चाणक्य अंत्यसंस्कार केंद्र (इचलकरंजी) अंत्यसंस्कार केंद्र
   चिंचवड  श्री लक्ष्मी शारदा विद्या प्रबोधिनी (कामशेत) रोजगार
   बारामती श्री सोपानदेव  रुग्णोपयोगी साहित्य केंद्र (सासवड ) रुग्णोपयोगी साहित्य केंद्र
   बारामती मधुमालती रुग्णोपयोगी साहित्य केंद्र (पाटस ) रुग्णोपयोगी साहित्य केंद्र
   बारामती मधुमालती सार्व.वाचनालय (पाटस ) वाचनालय
   प्रांत पंढरीची वारी आरोग्य सेवा प्रकल्प आरोग्य सेवा प्रकल्प
   सिंहगड (पुणे) निरामय आरोग्य तपासणी (वय १६ -२०) आरोग्य सेवा प्रकल्प
   सिंहगड (पुणे) निरामय क्रीडा प्रशिक्षण (मुली) खेळ
  • सत्संग (Satsang)

   स्वागतम्

  • सामाजिक समरसता (Samajik Samrasata)

   पश्चिम महाराष्ट्र मध्ये गेल्या अनेक शतकांपासून हिंदू धर्मामध्ये सामाजिक समरसता दिसून येते. गेल्या सातशे वर्षांहून अधिक काळ, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर दिंडी मध्ये सर्व हिंदू समाज, जात-पात, पंथ-संप्रदाय, राव-रंक हे भेदभाव  विसरून  अत्यंत मनापासून समरसलेला असा हिंदू समाज दिसून आला आहे. या  संत परंपरेमध्ये हिंदू समाजाने सर्व जाती पंथाच्या संतांना पूजनीय मानून त्यानुसारच अनुकरण केलेले आहे व आजही होत आहे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांनी येथेच रोवली.

   विश्व हिंदू परिषदेने  बंधुत्वाचे नाते असलेला एकसंध समरसता असलेला हिंदू समाज तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. विश्व हिंदू परिषदेने यावर्षीपासून विश्ववंदनीय महर्षी वाल्मिकी जयंती म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला देशभरात समरसता दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जयंती,  तसेच यांच्या विविध महान कार्याची माहिती समाजाला व्हावी यासाठी विश्व हिंदू परिषद वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करते.

  • प्रचार प्रसार (Media and Publications)

   विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत हिंदू संस्कृतीच्या प्रचारासाठी नियमित वेगवेगळे साहित्य प्रकाशित करते . हिंदुत्ववादी सामाजिक कार्यक्रम ,संमेलने सर्वांपर्यंत संपर्काचे प्रभावी मध्यम आहे . नियमित प्रकाशित होणारे साहित्य

   हिंदुबोध – मासिक

  • बजरंग दल (Bajrang Dal)

   स्वागतम्

  • दुर्गावाहिनी (Durgavahini)

   स्वामातृशक्ती दुर्गवाहिनीच्या माध्यमातून ६ सत्संग, ५ संस्कार केंद्रे व १४ साप्ताहिक  मिलने चालतात.
   गेल्या २ वर्षांपासून महिला दिनाचे औचित्य साधून थोड्या वेगळ्या प्रकारे “स्वर्णिम आभा सन्मान” या कार्यक्रमाद्वारे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या व विशेष सामाजिक योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान केला जातो. लेखिका, सरकारी सेवेतल्या किंवा बँक अधिकारी सामाजिक कार्याद्वारे सन्मान पात्र महिलांचा सत्कार केला जातो. २०१८-१९ या वर्षात मातृशक्ती-दुर्गवाहिनी सदस्यता अभियानाद्वारे विशेष प्रयत्नातून संपर्क केला व सदस्यता नोंदणी केली.
   याशिवाय प्रखंड स्तरावर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांचे औक्षण करून रक्षाबंधन तसेच समाजसेवा देणारे डॉक्टर, रिक्षा चालक यांचे देखील रक्षाबंधन केले जाते. नवरात्रामध्ये सप्तशतीपाठ व कन्यापूजनाचे कार्यक्रम साजरे केले जातात. याशिवाय सीतानवमी, मकरसंक्रमण कार्यक्रम घेतले जातात.
   दुर्गवाहिनीचे शौर्य प्रशिक्षण वर्ग मे महिन्यात संपन्न झाले. या वर्गात बौद्धिक तसेच शारीरिक प्रशिक्षण होते व त्या निमित्ताने ज्या स्थानांवर वर्ग असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य मिरवणूक काढून समाजाला दुर्गा शक्तीचे प्रदर्शन केले जाते. याशिवाय काही जिल्ह्यात ३ दिवसांचे वर्ग संपन्न होतात.गतम्

  • मातृशक्ति (Matrushakti)
  • धर्म प्रसार (Dharm Prasar)

   स्वागतम्

  • गोरक्षा (Gau Raksha)

   स्वागतम्

  • धर्माचार्य सम्पर्क (Dharmacharya Sampak)

   स्वागतम्

  • मठ मंदिर (Mutt – Mandir)
  • संस्कृत (Sanskrit)
 • संपर्क सूत्र (Contact Us)

  प्रांत कार्यालय पता :
  विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत
  १३६०,शुक्रवार पेठ ,भारत भवन ,नातूबाग,
  बाजीराव रोड पुणे -४११००२

Contact No : ०२० २४४७१७०१
Email : -
Back To Top